Makar Sankranti 2023

नमस्कार मंडळी !


तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. हे वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखसमृद्धीचे आणि समाधानाचे जावो हीच इच्छा.
वर्ष २०२३ मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत.

मंडळी, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करून झाले.  सूर्यदेव देखील उत्तरायणाला सज्ज झालाय मग आपलं रिचमंड मराठी मंडळ तरी कसे मागे राहणार .
तर मंडळी मागच्या वर्षाच्या गोड आठवणी सोबत घेऊन नवीन वर्षाची सुरुवात आपण एकदम  जल्लोषात करू या.  

सण संक्रांतिचा हा,

दिवस रात्र जेथे समान …

ठेवुनी संस्कृतीचे भान,

करूया संगळ्यांचा मान…

करोनि कार्य महान,

वाढवूया आपल्या प्रांताची शान …

”तिळगूळ घ्या गोड गोड बोला“.

तर मंडळी ग्रेटर रिचमंड मराठी मंडळ आपणा सर्वाना आमंत्रित करत आहे या वर्षीच्या पहिल्या वाहिल्या कार्यक्रमाला : “मकर संक्रांति २०२३”


कार्यक्रमाची तारीख/ वेळ: February 4th 2023, 3.30 PM at Hindu Center of Virgina