सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर हे त्यांच्या व्याख्यानमालेद्वारे धर्मादाय निधी उभारण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर येत आहेत. आपल्या रिचमंडमध्ये शुक्रवार, ३ मार्च २०२३ रोजी त्यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यान आयोजित केले आहे. ह्या कार्यक्रमाची माहिती सोबत जोडत आहे त्याची कृपया नोंद घ्यावी.
वेळ: संध्याकाळी 5:45 वाजता चहा आणि नाश्ता दिला जाईल आणि व्याख्यान ठीक 6:15 वाजता सुरू होईल.
कार्यक्रमाचे स्थळ : 5048 पार्कलँड ड्राइव्ह, ग्लेन ऍलन व्हर्जिनिया 23059
कार्यक्रमासाठी प्रवेश शुल्क GRMM सदस्यांसाठी प्रत्येकी $10 आणि सदस्य नसलेल्यांसाठी प्रत्येकी $15 आहे. तसेच GRMM सदस्यांच्या बच्चे कंपनीला विनामूल्य/मोफत प्रवेश दिला जाईल. कार्यक्रमापूर्वी चहा आणि नाश्ता आणि कार्यक्रमानंतर रात्रीचे जेवण वरील प्रवेश शुल्कामध्ये समाविष्ट आहे. तरी ह्या कार्यक्रमासाठी आपण स्वेच्छेने प्रवेश शुल्काव्यतिरिक्त अधिक देणगी मूल्य दिल्यास ते अवश्य स्वीकारले जाईल.
आपण प्रवेश शुल्क रोख रक्कम / धनादेशाद्वारे देऊ शकता अथवा Zelle द्वारे GRMM च्या treasurer@grmm.us ह्या पत्त्यावर जमा करु शकता . शक्य असल्यास Zelle द्वारे वरील शुल्क भरावे ही नम्र विनंती.
Some memorable memories of the event:









