नमस्कार मंडळी,
गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील GRMM करंडक आयोजित करत आहोत. GRMM करंडकाचा सोहळा यावर्षी दिनांक ६ मे २०२३ रोजी होणार आहे. ह्या निमित्ताने GRMM परिवारातील जास्तीत जास्त सभासदांना आपली कला प्रस्तुत करण्याची संधी मिळावी हा आमचा उद्देश आहे.
करंडक कार्यक्रमाची रूपरेखा खालील प्रमाणे –
- नाट्यप्रवेश/ स्किटची नोंदणी स्किटच्या विषयासोबत १५ मार्च २०२३ तारखे पर्यंत आमच्या cultural.director@grmm.us या ई-मेल पत्त्यावर पाठवावी. या तारखेनंतर प्राप्त झालेल्या नोंदी पात्र ठरणार नाहीत.
- कार्यक्रमात प्रत्येकी ८ मिनिटाचे असे एकूण ८ प्रवेश/स्किट्स सादर करता येतील.
- यंदा स्किटसाठी कोणत्याही विशिष्ट कथानकाच्या विषयाचा (theme) नियम नाही. तरी एक नम्र सूचना: मराठीच्या वेगवेगळ्या बोलींपैकी (dialects) एखादी विशिष्ट बोली (उदा. वऱ्हाडी, अहिराणी, पुणेरी, कोल्हापुरी, खान्देशी, मालवणी इत्यादी) वापरुन सादर केलेल्या स्किट्स/ नाट्यप्रवेशांचे विशेष स्वागत आहे.
- प्रत्येक प्रवेशात किमान 2 अभिनेते/अभिनेत्री सहभागी असावेत.
- एका व्यक्तीने एकाच स्किटमध्ये काम करावे. एकापेक्षा जास्त स्किटमध्ये काम करू नये.
- मंडळातर्फे रंगमंच (stage), मूलभूत प्रकाश योजना (lighting) आणि मूलभूत ध्वनी प्रणाली (sound system) ची व्यवस्था करण्यात येईल. सहभागी संघांनी आपापल्या स्किटसाठी आवश्यक असलेले नेपथ्य, इतर वस्तू/प्रॉप्सची व्यवस्था करणे अपेक्षित आहे.
- नोंदणी केलेले प्रवेश/ स्किट ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पात्र ठरतील. समतुल्य स्किट्सच्या अनेक नोंदणी आल्या तर प्रथम ई-मेल वर रजिस्टर केलेली नोंदणी गृहीत धरली जाईल.
- पूर्ण स्किट गाण्याची किंवा नृत्याची असेल तर चालणार नाही. स्किटमध्ये काही क्षण गाणी किंवा नृत्य असले तर चालेल.
- सगळ्या नोंदणी आल्यावर GRMM समिती सादरीकरणासाठी स्वीकारण्यात येणाऱ्या प्रवेश/स्किट्सचा अंतिम निर्णय कळवेल.
तेव्हा ताबडतोब प्रारंभ करा, आणि आपल्या दर्जेदार नाट्यप्रवेश/ स्किट्सची त्वरित नोंदणी करा.
ह्या कार्यक्रमात आपण सर्वच सक्रिय सहभाग घ्याल अशी आम्हाला आशा वाटते.
धन्यवाद,
GRMM २०२३ कार्यकारी समिती